तिच्या नस्ण्यानेही तिच्या असण्याची जाणीव आहे,
तिची आठवण रोज, आणि क्षणोक्षणी आहे...
तिची सवय आहे , कि तीची गरज आहे,
तिचं नसण मला खूप सलत आहे ....
कारण तिच्या नस्ण्यानेही तिच्या असण्याची जाणीव आहे....
आई ......हाच शब्द ऐकायला तिचे कान तरसतात
आज आईला हाक द्यायला माझे ओठ सरसावतात
वाटत, गेली असेल कुठेतरी काही वेळासाठी
परत येईल माझ्याजवळ आयुष्यभरासाठी......
पण हि फक्त मीच माझ्या मनाला घातलेली समजूत आहे
तिची आठवण रोज, आणि क्षणोक्षणी आहे...
तीच अशी असते जिच्या कुशीत बिधास्त जाता येत
राग काढता येतो , आणि तिच्या रागाल मम्मा प्लीज म्हणून उडवता येत
केसाना कुरवाळत ती उठ बाळ म्हणते ,
मुलगा असो कि मुलगी असो तिला सगळे सारखे असते ....
नवा नवा ड्रेस असो कि असो कुणाशी भांडण ,
तिच्याशी शेअर करायला नसत मनावर दडपण
देवालाही कदाचित मैत्री कळली असावी
म्हणूनच त्याने आईला इतक्या रुपात पाठवावी ...
आई तुझ्या प्रेमाची मी खूप खूप ऋणी आहे..
तुझी माझी प्रेमकथा , इतिहासात जुनी आहे ..
चल मला आता घरी यायचे आहे ,
कारण नसूनही असलेली माझी आई माझी दारात वाट बघत आहे ...
No comments:
Post a Comment